व्हीएसआरएस मराठी न्युज चिखली-भोसरी येथील यशवंत न सांगता घरातून बेपत्ता झाले आहेत. यशवंत रेवणसिध्दप्पा बिरादार असे या नाव असून याप्रकरणी त्यांच्या मुलगा आनंद यशवंत बिरादार यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस स्टेशन हरवल्याची खबर दिली आहे.
दरम्यान भोसरी पोलिसांनी याबाबत मिसींग केस दाखल केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, यशवंत बिरादार दि. 6/10/22 रोजी संध्याकाळी 17/45 वाजणेच्या पुर्वी सुमा वात्सल्य हॉस्पीटल समोर रोडवर भोसरी येथुन मनुष्य मिसीग गेले आहेत.
बेपत्ता यशवंत रेवणसिध्दप्पा बिरादार हे 67 वर्ष वयाचे आहेत. त्यांची उंची ५ फुट ६ इंच, चेहरा गोल, रंग सावळा नाक बस केस पांढरे वाढलेले पुढे टक्कल पडलेला मराठी, हिंदी, कन्नड भाषाचे ज्ञान अवगत आहे. नेसणीस सफेद रंगाचा शर्ट व ब्राऊन रंगाची पेंट पायात काळया रंगाचा शुज हाताचे घोटामध्ये पंचधातुची अंगठी ई. आहे.
वरील वर्णनाचे फिर्यादी यांचे वरील वर्णनाचे वडील हे वर नमूद ता वेळी व ठिकाणी मी माझे मुळगावी जाणार आहे असे सांगून कोठेतरी निघून गेले आहे.
तरी सदर व्यक्ती कुणास आढळल्यास भोसरी पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, असे आवाहन भोसरी पोलीस स्टेशन पिंपरी यांनी केले आहे.
Discussion about this post