व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2017 ते 22 हा पंचवार्षिकचा कार्यकाळ 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे.
तर, स्थायी समितीच्या अध्यक्षांचा कालावधी 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र, 13 मार्चपासून महापालिकेवर प्रशासक येणार असल्याने नव्या अध्यक्षांना अवघ्या 13 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. त्यामुळे स्थायीवर नव्या अध्यक्षांची नियुक्ती करण्याऐवजी नितीन लांडगे यांनाच मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन नवी महापालिका 13 मार्चपुर्वी अस्तित्त्वात येणे अपेक्षित होते. मात्र, करोना आणि ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या सदस्यांचा कार्यकाळ हा 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. तर निवडणूक होईपर्यंत पालिकेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती जाणार आहे. असे असले तरी स्थायी समिती अध्यक्ष व 8 सदस्यांचा कालावधी मात्र, 28 फेब्रुवारी रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे या 13 दिवसांच्या कालावधीसाठी नवे पदाधिकारी निवड होणे कायद्याने बंधनकारक आहे.
Discussion about this post