व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी – 24 तासात पिंपरी चिंचवड शहरामध्ये कोरोनाचे 113 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 404 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज दिवसभरात शहरातील विविध तपासणी केंद्रावर 06 हजार 208 संशयित लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 113 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 3 लाख 57 हजार 227 इतकी झाली आहे. त्याचवेळी शहरामध्ये 404 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत 3 लाख 51 हजार 078 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
शहरामध्ये सध्या 2271 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. यामध्ये 142 संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2129 होम क्वारंटाईनमध्ये आहेत. शहरामध्ये 02 रुग्णांच्या मृत्यूची (यापूर्वी मृत्यू झाल्याचा अहवाल आज प्राप्त झाला) नोंद झाली आहे. गेल्या 24 तासात 01 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोरोनामुळे शहरातील 4,609 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
Discussion about this post