व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथे नियोजित सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेचे अधिकारी सिंगापूर दौर्यावर रवाना झाले आहेत. महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांच्यासह पालिकेच्या चार व राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या एका अधिकाऱ्याचा दौऱ्यात समावेश आहे.
मुंबई, नवी दिल्ली आणि परदेशातील व्यापारी संकुलाच्या धर्तीवर महापालिकेच्या वतीने पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील चिंचवड येथे सिटी सेंटर हे व्यापारी संकुल बांधण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेने नेमलेल्या सल्लागारी संस्थेमार्फत दोन परदेश दौऱ्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या प्रकल्पासाठी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी दुबईचा दौरा केला होता. या दौर्यानंतर आता अधिकार्यांचा दुसरा दौरा सिंगापूर येथे होत आहे. त्यात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता विजय भोजने यांचा समावेश आहे. शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी चव्हाण यांचाही या दौर्यात समावेश आहे.
Discussion about this post