Pimpri News : पिंपरी : तळवडे येथे दि. ८ डिसेंबर २०२३ रोजी स्पार्कल्स तयार करणार्या कारखान्यात स्फोट होऊन १४ महिलांचा मृत्यू झाला होता. या मृत महिलांच्या वारसांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यशासनाच्यावतीने जाहीर केली होती. या पैकी पाच महिलांच्या वारसांना ५ लाख रुपये देण्यात आले असून अन्य नऊ महिलांच्या वारसांना मदत देण्याची प्रक्रिया चालू आहे अशी माहिती पिंपरी चिंचवडच्या तहसीलदार अर्चना निकम यांनी दिली आहे.
संगिता आबदार, पुनम मिश्रा, लता दंगेकर, मंगल खरवडे, कमलादेवी प्रजापती या मृत महिलांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्यात आले आहेत.
Discussion about this post