व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडील पाणीपुरवठा विभागाच्या अशुध्द जलउपसा केंद्र, रावेत आणि पाणीपुरवठा वितरण व्यवस्थेअंतर्गत यंत्रणेची आवश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करणे क्रमप्राप्त असल्यामुळे त्यासाठी रावेत नदी जलउपसा केंद्र येथील गुरुवार (दि.१८) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजेपर्यंत रावेत येथील जलउपसा केंद्र बंद राहणार आहे.
त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराचा (दि.१८) रोजी सायंकाळी होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवार (दि.१९) रोजी होणारा सकाळचा पाणीपुरवठा अनियमीत व कमी दाबाने होईल.
नागरिकांनी मनपाकडील उपलब्ध पाण्याचा पुरेसा साठा करुन काटकसरीने पाणी वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
Discussion about this post