Pimpri News : पिंपरी : देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा भाजपचे सरकार यावे म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील भाजपा कार्यकर्ते शतप्रतिशत योगदान देणार आहेत.पिंपरी विधानसभा क्षेत्रातून महायुतीच्या उमेदवाराला ६० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य देण्यात येईल असा ठाम विश्वास भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी व्यक्त केला आहे.
१४ मार्च रोजी पिंपरी विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुख व सुपर वॉरिअर्स यांची बैठक झाली. या बैठकीत गोरखे बोलत होते.
यावेळी उपस्थितांना संघटन मंत्री मकरंद देशपांडे तसेच पिं.चिं भाजपा शहराध्य्क्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे सदाशिव खाडे व अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले.
गोरखे पुढे म्हणाले, भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यक्रम नियोजनबद्ध रितीने व वेळेत पूर्ण केले जातील. सर्व बूथप्रमुख ते पक्षातील उच्चस्तरीय यंत्रणा काम सूत्रबद्धपणे काम करत आहे. या अभियानांद्वारे देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींच्या विचाराचे सरकार पाहिजे हा विश्वास पुन्हा एकदा मतदारांमधे जागृत करण्यासाठी कार्यकर्ते झटत आहेत.
मकरंद देशपांडे यांनी प्रत्येक बूथप्रमुखाला तसेच सुपर वॉरिअर्सना आपापल्या जबाबदार्या समजावून सांगितल्या.शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आपकी बार ४०० पारचा नारा दिला तर आमदार उमा खापरे यांनी बूथ सक्षमीकरण का महत्वाचे आहे याविषयी सांगितले.
बैठकीला पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, आमदार उमा खापरे, प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, संतोष कलाटे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, महिला आघाडी शहराध्यक्ष सुजाता पालांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष राजू दुर्गे, सरचिटणीस संजय मंगोडेकर,माजी नगरसेवक शीतल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष माऊली थोरात, मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक सागर फुगे, माजी उपमहापौर केशव घोळवे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे शैलेश मोरे, माजी नगरसेविका श्रीमती अनुराधा गोरखे, पिंपरी विधानसभा विस्तारक नंदू कदम, पिंपरी दापोडी मंडल अध्यक्ष निलेश अष्टेकर, चिंचवड स्टेशन प्राधिकरण मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, गणेश लंगोटे, कैलास कुटे, वैशाली खाडे यांच्यासह सर्व सुपर वॉरियर्स,बूथप्रमुख आणि कार्यकर्ते उपस्थित होते,
सरचिटणीस संजय मंगोडेकर यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार प्रदर्शन मनिषा शिंदे यांनी मानले.
बैठकीचे नियोजन पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे व मंडल अध्यक्ष राजेंद्र बाबर, निलेश अष्टेकर यांनी केले.
Discussion about this post