Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी पिंपरीतील एका कुख्यात एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
वैभव चोखोबा हातांगळे, बनसाळ गल्ली, गांधीनगर, पिंपरी असे या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्याविरोधात गंभीर दुखापत करणे, दंगा करणे, तडीपार आदेशाचा भंग करणे व घातक शस्त्रे जवळ बाळगणे अशा स्वरुपाचे एकंदर ७ गुन्हे दाखल आहेत.
आयुक्तांच्या आदेशानुसार त्याला १५ मार्च रोजी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, अपर आयुक्त, वसंत परदेशी, उपआयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे,सहायक आयुक्त, गुन्हे१, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक, पी.सी.बी. गुन्हे शाखा,अनिल देवडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), रूपाली बोबडे, हवालदार, सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी नाईक ओंकार बंड यांनी केली.
Discussion about this post