Pimpri News : पिंपरी : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि निवडणूक चिन्ह या बाबतचा निर्णय अजित पवार यांच्या बाजूने दिल्यानंतर संतप्त झालेल्या शरद पवार गटाच्या युवक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने केली.
यावेळी युवक शहराध्यक्ष इमरान शेख, महिला शहराध्यक्ष ज्योती निंबाळकर, युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर, प्रवक्ता माधव पाटील, भोसरी विधानसभा अध्यक्ष संतोष शिंदे,वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, महिला उपाध्यक्ष रेखा मोरे, जिल्हा सरचिटणीस मेघराज लोखंडे, शहर संघटक अश्रफ शेख, राजेश हरगुडे, नितीन मोरे, सचिन शिंदे, हाजी मलंग शेख, समाधान आचलखांब, तनवीर अहमद, पियुष अंकुश, साहिल वाघमारे,मयूर खरात,उमेश धोत्रे आणि मोठ्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
“महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार” आले शंभर गेले शंभर शरद पवार एक नंबर” आमचा पक्ष आमचे चिन्ह शरद पवार शरद पवार” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
Discussion about this post