New Delhi : नवी दिल्ली : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि त्याचे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्ष दुभंगल्यावर हा वाद निवडणूक आयोगापर्यंत गेला होता. त्यावर सुनावणी अंती आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे शरद पवार गटाला आता नवा पक्ष आणि निवडणूक चिन्हासह निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागण्याची शक्यता आहे.
Discussion about this post