Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुन्हेशाखेच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने सोमवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास भक्तीशक्ती स्मारकानजिक असलेल्या हॉटेल पूनागेट जवळ एका अमलीपदार्थ विक्रेत्याला अटक करून त्याच्याकडून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत पोलीस अंमलदार कपिलेश कृष्णा इगवे (वय-३२) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहजाद आलम अब्बास कुरेशी (वय-३८ रा. कुदळवाडी चिखली मुळ रा. चौकोनिया भारतभारी तहसील डुमरियागंज जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून मेफेड्रोन विकत घेणारा रिजवान चाँदीवाला (रा. नालासोपारा, मुंबई) याच्यावर एनडीपीएस अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जुना पुणे-मुंबई हावेवरील पुना गेट जवळ असलेल्या प्रोअॅक्टीव्ह टेक्निकल ऑथोपेडीक प्रा. लि. कंपनी समोर एकजण
मेफेड्रोन विक्रीसाठी थांबला असल्याची माहिती पथकाला मिळाली पोलिसांनी तेथे छापा घालून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ५४ ग्रॅम मेफेड्रोन सापडले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एस क्रॉस चारचाकी (एमएच १४ जी.वाय ८९६६), रोख ७८ हजार रुपये असा एकूण १६ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Discussion about this post