Pimpri News : पिंपरी : चिंचवडमधील मोहननगर परिसरातील व्यापारी संघटनेच्या नवनियुक्त पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा नुकताच महादेव मंदिर, मोहननगर येथे पार पडला.
यावेळी मोहननगर परिसरातील सर्व व्यापारी,दुकानदार, भाजी विक्रेते, हातगाडी चालक, टपरीधारक, उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.
संघटनेचे नवनियुक्त अध्यक्ष कमलेश मुथा यावेळी बोलताना म्हणाले, पुढील काळात जर कोणा समाजकंटकाने परिसरातील व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची भीड न बाळगता आपण सर्व व्यापारी बंधुभगिनी एकत्र येऊन त्याचा बंदोबस्त करू. हे करत असताना कोणाचीही गय केली जाणार नाही. यापुढे चुकीला माफी नाही.
संघटनेचे कार्याध्यक्ष मनोज शिंदे म्हणाले, संघटना ही सभासदांमुळे मजबूत होते. आणि संघटनेमुळे प्रत्येक सभासद मजबूतपणे उभा आहे.
दुसरे कार्याध्यक्ष कमलेश लुंकड यांनी मागील काही महिन्यांपूर्वी परिसरात काही अनुचित घटना घडल्या होत्या.त्यावेळी सर्वच पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, समाजसेवक, नागरिक तसेच पोलिसांनी व्यापार्यांना साथ दिल्याचे आपल्या भाषणात सांगितले. आणि यासर्वांच्या आभाराचा ठराव मांडला. तो संमत करण्यात आला.
मोहननगर पोलिस चौकीचे सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय गुळीग यांनी व्यापार्यांना त्रास देणार्या समाजकंटकांवर कडक कारवाई करून परिसरात भयमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण केले. या मुळे सर्वच व्यापाऱ्यांना व नागरिकांना दिलासा मिळाला म्हणून वरिष्ठ निरीक्षक राम राजमाने व सहाय्यक निरीक्षक दत्ता गुळिग यांना संघटनेतर्फे दिला जाणारा व्यापारी मित्र पुरस्कार 2024 जाहीर करण्यात आला.
यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
अध्यक्ष : श्री कमलेश मुथा.
कार्याध्यक्ष : श्री कमलेश लुंकड.
कार्याध्यक्ष : श्री मनोज शिंदे.
खजिनदार : श्री अशोक शेलार.
उपखजिनदार : श्री रमेश जाट.
सेक्रेटरी : श्री रंनजीत ननवरे.
उपसेक्रेटरी : श्री हिराराम चौधरी.
वरिष्ठ उपाध्यक्ष : श्री संजय मानूरकर.
उपाध्यक्ष : श्री दिनेश चौधरी.
उपाध्यक्ष : श्री मुकेश चौधरी.
उपाध्यक्ष : श्री मनोज शर्मा.
सदस्य : श्री वीरेंद्र कुमारराम.
सदस्य : श्री किशोर लुंकड.
सदस्य : श्री संदीप कोकरे.
सदस्य : श्री विलास पाटील.
सदस्य : श्री जावेद शेख.
सदस्य : श्री शिवा गोणते.
महिला सदस्य : सौ अश्विनी मदने.
महिला सदस्य : श्रीमती आशा लोणकर.
महिला सदस्य : श्रीमती रुपाली लोहार.
Discussion about this post