Pimpri News : पिंपरी : कुदळवाडी, चिखली येथील एका दुकानदाराला त्याच्या दोन नोकरांनी तब्बल १० लाखांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी दुकानदाराने चिखली पोलीसठाण्यात तक्रार दिली असून दोन्ही नोकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या पैकी एकाला अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय बसवराज श्रीगिरी (रा. आळंदी), पोपट दत्तात्रय भोसले (रा. चिखली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून दुकानदार जोस जोसेफ मॅथ्यू (वय ५७, रा. चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. पोपट भोसले याला पोलिसांनी अटक केली आहे.
१३ एप्रिल २०२१ ते २३ फेब्रुवारी२०२४ या कालावधीत हा प्रकार घडला आहे. मॅथ्यू यांचे कुदळवाडीत जे.के.टूल्स नावाचे दुकान आहे. तेथे आरोपी काम करत होते. या पैकी दत्तात्रय श्रीगिरी याने ग्राहकांना उधारीवर दिलेल्या मालाचे ७ लाख रुपये ग्राहकाकडून ऑनलाईन स्वतःच्या खात्यावर जमा करून घेतले.तर पोपट भोसले याने ३ लाख ४८ हजार रुपयांचा माल मालकाच्या अपरोक्ष विकून ते पैसे स्वतःकडे ठेवून मालक मॅथ्यू यांची फसवणूक केली.
Discussion about this post