Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात दहशत असलेला सराईत गुंड आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय 22, रा. शरदनगर, चिखली) याला तडीपार करण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी तसे आदेश जारी केले आहेत.
मोन्या लुडेकर याची चिखली परिसरात दहशत असून त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने आपली टोळी तयार करून चिखली परिसरात दहशत माजविण्यास सुरुवात केल्याने चिखली पोलिसांनी त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव आयुक्तालयाकडे पाठविला होता.त्यावर उपायुक्त शिवाजी पवार यांनी त्याला दोन वर्षे तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.
ही कारवाई उपायुक्त डॉ शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त संदीप हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, सहाय्यक निरीक्षक उद्धव खाडे, उपनिरीक्षक राजेश मासाळ, अंमलदार सचिन गायकवाड, दुर्गा केदार यांनी केली.
Discussion about this post