Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील काळेवाडीफाटा परिसरात एका सराईत गुंडाची अज्ञात व्यक्तींनी दिवसाढवळ्या दगडाने ठेचून खून केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
रेहान शेख असे मृत गुंडाचे नाव असून तो जुनी सांगवी येथील रहिवासी होता.
१ मे रोजी तो काळेवाडी परिसरात आला असताना काही जणांनी त्याच्यावर दगडफेक करत हल्ला केला. आणि त्याला ठेचून ठार मारले. हा प्रकार भरदिवसा घडल्यामुळे परिसरात खळबळ माजली. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. आरोपींचा शोध सुरू आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.
Discussion about this post