Pimpri News : चिंचवड : चिंचवड येथील गीता मंदिर प्राथमिक शाळेत शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.संपूर्ण शालेय परिसर शिवमय झाला होता.पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तुषार हिंगे व स्थायी समितीचे माजी अध्यक्ष शीतल शिंदे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.आरती करण्यात आली.शाळेचे मुख्याध्यापक श्री महेंद्र भोसले यांनी हिंगे व शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
एकच राजा इथे जन्मला, दैवत छत्रपती, आम्ही शिवकन्या,राज आलं, माय भवानी,युगत मांडली,अशी गाणी नृत्य व पोवाडा सादर करण्यात आला.कार्यक्रमास पालकवर्ग माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजनचंदा नामदे यांनी केले.सुत्रसंचालन नेहा साठे या विद्यार्थिनीने केले.संगिता शहासने,मंदा कोकरे,ज्योत्स्ना वाव्हळ,सुनिता धोंडगे व सर्व शिक्षक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
Discussion about this post