Pimpri News : पिंपरी : नूर ए ईमान तेहरीक (नीस्ट)च्या वतीने सर्व धर्मीय इफ्तार पार्टीचे चिखली येथे आयोजन करण्यात आले होते.या इफ्तार पार्टीला स्थनिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यावेळी टेल्कोचे कामगार नेते सचिन लांडगे, माजी महापौर राहुल जाधव, भाजपा उपाध्यक्ष किसन बावकर, माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, जितू यादव, संतोष मोरे, अमृत सोनवणे, विठ्ठल मोरे, बाळू मोरे, यशवंत साने,फारूख इनामदार, निस्टचे अध्यक्ष फिरोज शेख आणि चिखली गावातील सर्वच प्रमुख ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन शिवाजी अंबिके यांनी केले तर आभार व प्रास्ताविक निष्ठचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले.
Discussion about this post