Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, यमुनानगर येथे ९ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रा आयोजित करण्यात आली असून या शोभायात्रेसाठी हिंदुत्ववादी आणि गोरक्षक कार्यकर्ता मिलिंद एकबोटे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या उपस्थितीस वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. एकबोटे यांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मज्जाव करावा अन्यथा कार्यक्रमाच्या स्थळी निदर्शने केली जातील असा अर्ज वंचित बहुजन आघाडीचे संघटक प्रमोद क्षीरसागर आणि प्रसिद्धी प्रमुख बुद्धभूषण अहिरे यांच्यासह मेघा आठवले यांनी निगडी पोलीसठाण्यात दिला आहे.
Discussion about this post