Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील ज्येष्ठ पत्रकार मदन जोशी यांचे शुक्रवारी अल्प आजाराने निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
ते ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात होते.छायाचित्रकार आणि पत्रकार म्हणून असंख्य दैनिके, साप्ताहिके आणि मासिकांमधून त्यांनी काम केले. जोशी यांचे वडील चिंचवडमधील प्रसिद्ध गायक, अभिनेता होते. त्यामुळे मदन जोशी यांनाही रंगभूमीबद्दल आकर्षण होते. महात्मा फुले यांच्यावर चित्रपट तयार करण्याचे त्यांचे स्वप्न होते.राजकारण, समाजकारण, शिक्षण आणि क्रीडा यासह विविध क्षेत्रात सक्रिय सहभागासाठी ते ओळखले जात.
सकाळी साडेअकरा वाजता चिंचवड लिंक रोडवरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Discussion about this post