Pimpri News : पिंपरी : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातून नुकताच शिवसेनेच्या ठाकरे गटात केलेल्या संजोग वाघेरे यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपविली आहे.
यामुळे वाघेरे यांना आता या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी मिळणार हे निश्चित झाल्यात जमा आहे. वाघेरे यांनी लोकसभेची उमेदवारी डोळ्यासमोर ठेवून अलिकडेच पक्षांतर केले. त्यावेळी त्यांनी आपण लोकसभा उमेदवारी मिळण्यासाठी शिवसेनेत प्रवेश केल्याचे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले होते.
Discussion about this post