Pimpri News : मावळ : शिवसेनेचा हक्काचा ओळख म्हणून असणारा लोकसभा मतदार संघ म्हणजे मावळ लोकसभा मतदार संघ. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना यांनी यावर दावा सांगितला आहे. शिवाय मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे देखील उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे गटाकडून यासाठी उमेदवारीची चर्चा सुरू झाली. दरम्यान अजित पवार यांचे खंदे समर्थक असलेले संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेसाठी उद्धव ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांना उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यानंतर संजोग वाघेरे हे देखील चांगलेच ‘ॲक्टिव्ह’ झालेले पहायला मिळत आहेत. मावळ लोकसभा लोकसभेत त्यांनी दौरे करायला सुरुवात केली आहे.
अजित पवार यांच्यासोबत राहून राजकारणाचे धडे घेतलेले संजोग वाघेरे सुरुवातीपासून राष्ट्रवादी सोबत एकनिष्ठ होते. मात्र, काही कारणावरून त्यांनी अजित पवार यांना सोडत उध्दव ठाकरे यांच्यासोबत जात मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधले. त्यानंतर संजोग वाघेरे हे चांगलेच ॲक्टिव्ह झालेले पाहायला मिळत आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी पहिला मेळावा पिंपरी येथे घेऊन जणू संजोग वाघेरे यांच्या उमेदवाराची घोषणाच केल्याचे पाहायला मिळाले.
संजोग वाघेरे यांनी मावळ लोकसभेची जय्यत तयारी करण्यास सुरुवात केली आहे. गावभेटी, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद, तसेच रिक्षांवर असलेले बॅनर, यातून त्यांनी आपली ताकत दाखवण्यास सुरुवात केली आहे. मावळ लोकसभेसाठी शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना पहायला मिळण्याचे सध्या तरी चित्र आहे. कारण श्रीरंग बारणे यांनी देखील त्यांची उमेदवार निश्चित असल्याचे सांगत तयारी सुरू केली आहे.
शिवसेनेचा यांचा हक्काचा लोकसभा मतदार संघ म्हणून मावळ लोकसभा मतदार संघाकडे पाहिले जाते. शिवबंधन हाती बांधून मैदानात उतरलेला उध्दव ठाकरे यांचा शिलेदार संजोग वाघेरे यांनी देखील आपली ताकत दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाचे पारडे जड राहणार हे पाहायला मिळणार आहे. मात्र, उध्दव ठाकरेंचे शिलेदार संजोग वाघेरे यांनी रणशिंग फुंकत जोरदार तयारी सुरुवात केली असल्याचं चित्र आहे.
Discussion about this post