Pimpri News : पिंपरी : दि इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी पंकज पाटनी यांची निवड करण्यात आली .
निगडी येथील संस्थेच्या कार्यालयात नुकत्याच घेण्यात आलेल्या निवडणूकीमध्ये त्यांची निवड जाहीर करण्यात आली . मावळते अध्यक्ष – सचिन बन्सल यांच्याकडून पंकज पाटनी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली.
संस्थेची जाहीर केलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे वैभव मोदी -उपाध्यक्ष, सारिका चोरडीया( सचिव), शैलेश बोरे (खजिनदार), सचिन ढेरंगे(अध्यक्ष सीए विद्यार्थी संघटना) , माजी अध्यक्ष सचिन बन्सल , विजयकुमार बामने आणि यांचा समावेश आहे.
संस्थेच्या आवारात सदस्य आणि विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा ,कर विषयक ज्ञान प्रसार, परिसंवाद, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि इतर समाज उपयोगी उपक्रम वर्षभर उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष पंकज पाटनी यांनी दिली.
Discussion about this post