Pimpri News : पिंपरी : शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे रविवारी पिंपरी चिंचवड शहरात येत आहेत. पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे दुपारी साडेबारा वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर, युवा सेनेचे सचिव वरूण सरदेसाई असणार आहेत.
या सभेची माहिती देण्यासाठी गुरुवारी उबाठा शिवसेनेच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लाेकसभा मतदार संघाचे संघटक संजाेग वाघेरे पाटील, पुणे जिल्हाप्रमुख ॲड. गाैतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मीनल यादव, रेखा दर्शीले, धनंजय आल्हाट, अमित गावडे तसेच निलेश मुटके, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, अनिता तुतारे, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मंगल भोकरे, वैभवी घोडके, कामिनी मिश्रा, अमोल निकम, नेताजी काशिद आदी उपस्थित हाेते.
आदित्य ठाकरे यांचे भक्ती शक्ती चौकात पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल, या नंतर भक्तीशक्ती चौक ते पिंपरीतील आंबेडकर चौक अशी रॅली काढली जाणार आहे.हजारो कार्यकर्त्यांसोबत आदित्य ठाकरे दुचाकी रॅली मध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीचे स्वागत निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौक चौकात होणार आहे.
Discussion about this post