Mumbai News : नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर आज दि. १९ जानेवारी रोजी पहाटे माणिकखांब नजिक सोने आणि चांदी घेऊन जाणार्या एका कुरियर सर्व्हीसच्या गाडीवर सशस्त्र दरोडा घालून दरोडेखोरांनी ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.
मिळालेल्या माहितीनुसार बजरंग कुरियर सर्व्हीस या कुरियर सर्व्हीसची एक मारुती एको कार मुंबईहून धुळ्याकडे निघाली होती या कारमध्ये ३ कोटी ६७ लाख ५५ हजार रुपयांचे सोने आणि चांदी दागिने आणि बिस्किटे स्वरुपात होती.गाडी माणिकखांबजवळ आली असता दरोडेखोरांनी पुढे आणि मागे गाड्या लावून कुरियरची गाडी अडवली. त्यानंतर शस्त्राचा धाक दाखवून चालक आणि त्याच्या सहकार्याला बाहेर खेचले. त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून गाडीतील सर्व ऐवज लुटून नेला.
पोलिस अधिक तपास करत आहेत.
Discussion about this post