Pimpri News : पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील सराईत गुन्हेगारांवर मोठ्याप्रमाणात मोक्का, एमपीडीए व तडीपारीची कारवाई केली आहे.
सन २०२४ मध्ये आजपावेतो पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रातील ०३ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत व ०३ आरोपींवर एमपीडीए कायद्या अंतर्गत आणि १७ गुन्हेगारांवर तडीपारी कारवाई, असे एकुण ३९ गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे.
यामध्ये पिंपरीतील सूरज किरवले टोळीतील टोळीप्रमुख सूरज किरवले, यश ऊर्फ पाशा कैलास भोसले,अविनाश प्रकाश माने, गणेश जमदाडे वाकड पोलीसठाण्याच्या हद्दीतील खताळ टोळीतील टोळीप्रमुख रोहीत मोहन खताळ, साहील हानीफ पटेल, ऋषीकेश हरी आटोळे, शुभम चंद्रकांत पांचाळ,अनिकेत अनिल पवार, प्रितम सुनिल भोसले,शिवशंकर शामराव जिरगे, सुमित सिद्राम माने, गणेश बबन खारे,अजय भिम दुधभाते, मुन्ना एकनाथ वैरागर, कैवल्य दिनेश जाधवर निगडीतील पुजारी टोळीचा टोळीप्रमुख अमन शंकर पुजारी, शिवम सुनिल दुबे, रत्ना मिठाईलाल बरुड यांच्यावर पोलीस आयुक्तांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्याखाली कारवाई केली आहे.
तर १४ गंभीर गुन्हे दाखल असलेला काळेवाडीतील संदेश उर्फ शिलव्या लाजरस चोपडे, ३ गुन्हे दाखल असलेला दिघीतील अनिकेत उर्फ गुड्या संजय मेटघरे आणि नेहरूनगर मधील दहा गुन्हे दाखल असलेला दीपक सुरेश मोहिते या शहरातील ३ दाखलेबाज गुन्हेगारांविरोधात एमपीडीए कायद्याखाली स्थानबद्धतेची कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
१) आनंद किशोर वाल्मिकी (वय २९ रा. काळा खडक वाकड, पुणे)
२) संकेत माणिक कोळेकर (वय २२ रा धामणे ता. खेड जि पुणे)
३) आकाश बाबु नडविन मणी (वय २१ रा. मोरे वस्ती चिखली)
४) आशिष एकनाथ शेटे (वय २४ रा. नखाते वस्ती रहाटणी पुणे)
५) रोहित /गब-या राजस्वामी (वय २२ रा. एमबी कॅम्प देहुरोड, पुणे)
६) रुषिकेश /श-या अडागळे (वय २४ रा गांधीनगर देहुरोड पुणे)
७) सुरज रामहरक जैस्वाल (वय २१ मिठु शठे चाळ नेहरुनगर पिंपरी)
८) शुभम राजु वाघमारे (वय २२ रा. विठठलनगर नेहरुनगर पिंपरी पुणे)
९) वृषभ नंदु जाधव (वय २१ रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
१०) शेखर/बका बाबु बोटे (वय २० रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
११) शुभम अशोक चांदणे (वय १९ रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
१२) शांताराम मारुती विटकर (वय ३४ रा. इंदिरा नगर चिंचवड पुणे)
१३) अनुराग दत्ता दांगडे (वय १९ रा. इंदिरा नगर चिंचवड पुणे)
१४) सागर ज्ञानदेव ढावरे (वय २० रा. मिलींदनगर पिंपरी पुणे)
१५) पंकज दिलीप पवार (वय ३२ रा आण्णासाहेब मगर चिंचवड पुणे)
१६) सोन्या / महेश श्वेणसिध्द कांबळे (वय २१ रा. दत्तनगर चिंचवड पुणे)
१७) आनंद नामदेव दणाणे (वय ३१ रा विद्यानगर, चिंचवड पुणे)
यांना तडीपार करण्यात आले आहे.
Discussion about this post