Pune News : पुणे : पुणे पोलिसांनी मेफेड्रोन हा अमलीपदार्थ तयार करून विकणार्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश करण्यात मोठे यश मिळविले असून आजपर्यंत पुणे, कुरकुंभ, सांगली, दिल्ली येथून दोन टन मेफेड्रोन जप्त करण्यात यश मिळविले आहे. याची किंमत सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे.
पोलिसांनी या प्रकरणी सर्वप्रथम गुंड वैभव उर्फ पिंट्या भरत माने, हैदर नूर शेख, अजय अमरनाथ करोसिया यांना अटक केली होती. त्यानंतर कुरकुंभ येथे ज्या कारखान्यात मेफेड्रोन बनत होते त्या कारखान्याचा मालक भीमाजी उर्फ अनिल परशुराम साबळे, मेफेड्रोन तयार करण्याचा फॉर्म्युला तयार करणारा युवराज भुजबळ यांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी दिल्लीतून दिवेश भुतिया, संदीप राजपाल कुमार आणि संदीप हनुमानसिंग यादव यांना दिल्लीतून अटक केली आहे.
याशिवाय विदेशी नागरिक पॉल आणि ब्राऊन यांचा शोध जारी आहे. कुपवाड, सांगली येथे छापा घालून पोलिसांनी १४० किलो मेफेड्रोन जप्त केले आहे. येथून काही मेफेड्रोन विदेशात पाठविले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
Discussion about this post