Pimpri News : पिंपरी : मोशी, खडीमशीन परिसरातील एका दगडखाणीत मंगळवारी एका १७ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळून आला.मृताची ओळख पटली असून त्याचे नाव प्रदीप शामा देवकर असे आहे.
तो खानदेशनगर, मोशी येथे रहात होता. मागील ३ दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याच्या नातेवाईकांनी तो बेपत्ता असल्याची तक्रार भोसरी एमआयडीसी पोलीसठाण्यात नोंदविली होती. पोलीस त्याचा शोध घेत होते. दरम्यान सकाळी या दगडखाणीकडे गेलेल्या नागरिकांना पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले. त्यांनी पोलिसांना कळविल्यानंतर भोसरी पोलीस घट्नास्थळी दाखल झाले. तथापि मृतदेह दिघी पोलीसठाण्याच्या हद्दीत आढळल्याने दिघी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दिघी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात पाठविला आहे.
हा मृत्यू अपघात, घातपात की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Discussion about this post