Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेतील दोन उपायुक्तांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. त्यांची बदली झाली आहे. तसे आदेश नगरविकास खात्याने जारी केले आहेत.
पालिकेच्या समाजकल्याण विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर आणि क्रीडा व जनसंपर्क विभागाचे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांना पालिकेतून बदलण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्यांची अन्यत्र नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यांना पदस्थापनेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चारठाणकर ऑगस्ट २०२० मध्ये आणि दंडवते जुलै २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड पालिकेत रुजू झाले होते. स्वतंत्र आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Discussion about this post