Pimpri News : पिंपरी : दोन सराईत घरफोड्यांना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल १ किलो ७ तोळे सोने जप्त केले आहे.या घरफोड्यांच्या अटकेमुळे १८ गुन्हे उघडकीस आले आहेत.
आमिर शब्बीर शेख (वय २५ रा. निगडी प्राधिकरण) व सोहेल शफीक पठाण ( वय २३ रा.निमगाव) अशी या सराईतांची नावे आहेत.
महाळुंगे पोलीस परिसरातील चोर्यांचा छडा लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासत होते.या नंतर चोरटे लाल रंगाच्या स्कुटीवरून येत असल्याचे त्यांना दिसून आले.परिसरात लालरंगाच्या स्कुटीवरून फिरणार्या संशयितांचा शोध घेत असता त्यांना दोघेजण लाल स्कुटीवरून येताना त्यांना दिसले. त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे ४७ तोळे सोने रोख ३ लाख रुपये आणि स्कुटी असा ऐवज पोलिसांना सापडला.
पोलिसीखाक्या दाखविल्यानंतर त्यांनी मावळ, पिंपरी चिंचवड परिसरात टेहळणी करून बंद बंगल्यामध्ये घरफोडी करत असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी त्यांच्याकडून एकूण ४४ लाख ३३ हजार ४०० रुपयांचे १ किलो ७ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले आहे.
Discussion about this post