Pimpri News : पिंपरी : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावानजिक २१ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक कार पुढे चाललेल्या कंटेनरवर मागून आदळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण गंभीर जखमी झाले. अपघातग्रस्त कारमधील कुटुंब पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असून ते मुंबईहून पुण्याकडे येत होते.
मयुरी थोरात आणि सुनील थोरात अशी मृतांची नावे आहेत. अक्षय थोरात, दत्तात्रय थोरात, तेजल थोरात, श्रद्धा थोरात, आणि राजीव थोरात हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार थोरात कुटुंब मुंबईहून पिंपरी चिंचवडकडे निघाले होते. कामशेत येथील बोगदा पार केल्यानंतर पुढे असलेल्या कंटेनरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कारने कंटेनरला मागून धडक दिली. ही धडक एव्हढी जोरात होती की, कारच्या पुढील सर्व भागाचा चक्काचूर झाला.
दोघांचा जागीच मृत्यू झाला.जखमी झालेल्या पाचजणांना सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Discussion about this post