Pimpri News : पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने दि. २० फेब्रुवारी रोजी चिखली रस्त्यावर गांजा विकणार्या एका तरुणाला अटक करून त्याच्याकडून दीड किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन महिलांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तालिब लतीफ मोहम्मद (वय 23, चिखली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने एका महिलेच्या सांगण्यावरून अन्य एका महिलेकडून गांजा विकण्यासाठी आणला होता. त्यामुळे या महिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे.
तालिब चिखली रस्त्यावर गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी त्याला तेथे सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे १ किलो ५८८ ग्रॅम गांजा, ९२ हजार रुपये रोख आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याच्याविरोधात चिखली पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Discussion about this post