Pimpri News : पिंपरी : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणीतील श्रीराम मंदिर, पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरामध्ये नाना काटे सोशल फाऊंडेशन, उमेश काटे सोशल फाऊंडेशन, सागर कोकणे युवा मंचाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दोन दिवसांपूर्वी रहाटणी येथील राममंदिराची स्वच्छता करून नाना काटे यांनी या कार्यक्रम शृंखलेचा प्रारंभ केला होता.
आज २२ जानेवारी रोजी आरती, रामरक्षा पठण, भजन, किर्तन, महाप्रसाद तसेच अयोध्या येथील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे एलसीडी स्क्रीनद्वारे थेट प्रक्षेपण यांचा या कार्यक्रमांमध्ये समावेश होता. भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नाना काटे, शितलताई काटे उमेश काटे, सागर कोकणे यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली.
नाना काटे सोशल फाऊंडेशन व उमेश काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने रहाटणी पिंपळे सौदागर मधील नागरिकांना घरोघरी जाऊन राम मंदीराची प्रतीकृती, पणतीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.यावेळी परिसरातील रहाटणी, पिंपळे सौदागर मधील भाविक, भजनी मंडळ, राम मंदीराचे सेवक, शिवशंभो सेवा मंडळांचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discussion about this post