Pimpri News : पिंपरी : पुणे जिल्हा आम आदमी पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष वहाब शेख यांनी १० जानेवारी रोजी आमदार रविंद्र धंगेकर आणि काँग्रेसचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कैलास कदम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यांच्यासोबत आम आदमी पक्षाचे माजी शहराध्यक्ष अनुप शर्मा, उपाध्यक्ष महेश बिराजदार- पाटील, महिला उपाध्यक्ष सिमा यादव, मैमुना शेख, मेहनाज मोमिन, सामाजिक न्याय विभाग पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष दीपक श्रीवास्तव, सचिव सतीश नायर, सहसचिव अजय गायकवाड, पिम्परी विधानसभा अध्यक्ष मुकेश जाधव, उपाध्यक्ष जावेद शेख, एस टी आघाडी अध्यक्ष संतोष बघाव, चिंचवड़ विधानसभा अध्यक्ष विष्णु पाटील, सामाजिक न्याय विभाग पुणे जिल्हा सचिव सद्दाम पठाण, यांच्यासह शहरातील पक्षाच्या आजी-माजी 50 कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Discussion about this post