व्हीएसआरएस मराठी न्युज –टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्याचं आयोजन हे पंजाब क्रिकेट असोसिशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. या सामन्याला थोड्याच वेळात संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस पार पडला. नाणेफेकीचा कौल हा टीम इंडियाच्या बाजूने लागला. टॉस जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे.
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन| रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, तिलक वर्मा, शिवम दुबे, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग आणि मुकेश कुमार.
अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | इब्राहिम झद्रान(कॅप्टन), रहमानुल्लाह गुरबाज(विकेटकीपर), रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, मोहम्मद नबी, नजीबुल्ला जद्रान, करीम जनात, गुलबदिन नायब, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक आणि मुजीब उर रहमान.
Discussion about this post