व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने पुणे-पिंपरी-चिंचवड मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाचा पहिला टप्पा कार्यान्वयीत झाला असून, आता पिंपरी ते निगडीपर्यंत आणि हिंजवडी ते चाकण मार्गाबाबत प्रस्ताव तयार केला असून, त्याला मंजुरी मिळाली पाहिजे. महावितरण संबंधित मोशी सफारी पार्क येथे सब स्टेशन उभारणे गरजचे आहे. त्यामुळे जाधववाडी, मोशी, डूडूळगाव, वडमुखवाडी, आळंदी, चोविसावाडी, चिखली या भागातील वीज पुरवठा सुरळीत करता येईल. तसेच, प्राईड वर्ल्ड सिटी, चऱ्होली येथे अतिउच्चदाब सबस्टेशन उभारल्यास चऱ्होली गाव, दिघी, लोहगाव या भागातील वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. यासह भोसरी मतदार संघातील महावितरण संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी निधीची उपलब्धता व्हावी, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
पुणे येथील विधान भवनमध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. यावेळी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडमधील प्रलंबित प्रश्नांबाबत प्रशासन आणि पालकमंत्र्यांचे लक्ष वेधले
Discussion about this post