व्हीएसआरएस मराठी न्युज –चिखली प्राधिकरण सेक्टर १७ व १९ मध्ये महापालिकेतर्फे आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. त्यातील दोन इमारतींमधील ८४ सदनिकांसाठी संगणकीकृत सोडत सोमवारी (ता.१७) ऑटो क्लस्टर सभागृहात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांच्या हस्ते काढण्यात आली.
सहायक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे आदी उपस्थित होते. नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थांसाठी तात्पुरत्या स्वरूपात निवड केलेल्या सोसायटी क्रमांक १४६ (इमारत क्रमांक डी-६) चे अध्यक्ष महेंद्र कुमार गायकवाड आणि सोसायटी क्रमांक १४७ (इमारत क्रमांक डी-७) चे अध्यक्ष शिव कुमार पिल्ले यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण असावे, घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारतींभोवती झाडे लावून, त्यांची योग्य प्रकारे निगा राखावी, असे आवाहन जगताप यांनी केले. विष्णू भाट यांनी सूत्रसंचालन केले.
Discussion about this post