व्हीएसआरएस मराठी न्युज -पितृ पक्ष किंवा पितृ पंधरवडा भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि पितृमोक्षम अमावस्येपर्यंत चालू असतो. पितृ पक्ष आजपासून म्हणजेच 29 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, जो 14 ऑक्टोबरला संपेल.
पितृ पक्षादरम्यान, आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी त्यांचे स्मरण करण्यासाठी श्राद्ध केले जाते. हरिद्वार, गया इत्यादी देशातील महत्त्वाच्या ठिकाणी जाऊन पिंडदान करून पित्र प्रसन्न होतात.
पितृ पक्ष 2023 महत्त्वाच्या तारखा
29 सप्टेंबर 2023, शुक्रवार: पौर्णिमा श्राद्ध
30 सप्टेंबर 2023, शनिवार: द्वितीया श्राद्ध
01 ऑक्टोबर 2023, रविवार: तृतीया श्राद्ध
02 ऑक्टोबर 2023, सोमवार: चतुर्थी श्राद्ध
03 ऑक्टोबर 2023, मंगळवार: पंचमी श्राद्ध
04 ऑक्टोबर 2023, बुधवार: षष्ठी श्राद्ध
05 ऑक्टोबर 2023, गुरुवार: सप्तमी श्राद्ध
06 ऑक्टोबर 2023, शुक्रवार: अष्टमी श्राद्ध
07 ऑक्टोबर 2023, शनिवार: नवमी श्राद्ध
08 ऑक्टोबर 2023, रविवार: दशमी श्राद्ध
09 ऑक्टोबर 2023, सोमवार: एकादशी श्राद्ध
10 ऑक्टोबर 2023, मंगळवार: माघ श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023, बुधवार: द्वादशी श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023, गुरुवार: त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार: चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, शनिवार: सर्व पितृ अमावस्या
पितृपक्षात आपल्या पितरांच्या तृप्तीसाठी जे भोजन श्रद्धापूर्वक अर्पण केलं जातं, त्याला श्राद्ध असं म्हणतात. पितरांना जे भोजन अर्पण केलं जातं, ते पिंड स्वरूपात तयार करून अर्पण केलं जातं.
श्राद्धाच्या वेळी पिंडदान केलं जातं. श्राद्धाच्या तिथीला पितरांना भात, तीळ आणि जव यांच्या मिश्रणापासून तयार केलेले पिंड दान केले जातात. त्यालाच पिंडदान म्हणतात. तर्पण आणि पिंडदान हे श्राद्धातलेच दोन विधी आहेत.
Discussion about this post