Pune News : पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार यांच्यासह १६ जणांवर पुण्याचे पोलीस आयुक्त रितेशकुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ‘मोक्का’ लावण्याचे आदेश दिले आहेत.
आतापर्यंत पोलिसांनी या प्रकरणात साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांना अटक केली आहे.तर, गणेश मारणेचा शोध सुरू आहे.
Discussion about this post