New Delhi : नवी दिल्ली : विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरणी निर्णय घेण्यास मुदतवाढ दिली आहे.शरद पवार गटाचे जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर झालेल्या सुनावणीच्यावेळी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने ही मुदतवाढ दिली आहे.
राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रता प्रकरण विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर प्रलंबित आहे.दरम्यान अजित पवार गटाच्या आमदारांना अपात्र करण्याचे निर्देश विधानसभाध्यक्षांना द्यावेत अशी याचिका जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणात ३१ जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. तथापि ही मुदत संपण्यास दोन दिवस बाकी असताना विधाससभाध्यक्षांच्यावतीने तीन आठवड्यांची मुदतवाढ मागण्यात आली. खंडपीठाने या प्रकरणी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली.
Discussion about this post