Pune News : पुणे : पुणे पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील चंदननगर पोलीसठाण्याच्या हद्दीत टोळी तयार करून सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करत असल्याने मोक्का कायद्यान्वये कारवाई झाल्यामुळे फरार झालेल्या एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे.
आदित्य संदेश कांबळे, वय २३, रा. बालाजी नगर, लेन नं. ३, वडगाव शेरी पुणे असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर चंदननगर पोलीसठाण्यात ५३४/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ३०८,१४३,१४७,१४८, १४९, ४२७, सह भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४, २५ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७ (१) (३), १३५, सह क्रिमीनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट कलम ३, ७, महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१)(फ), ३(२),३(४) अन्वये गुन्हा दाखल आहे.
आपल्यावरील अटकेची कारवाई टळावी म्हणून तो मागील चार महिन्यांपासून फरार होता. या काळात तो सातारा, सांगली, नाशिक भागात वावरत होता. त्याचा शोध घेत असताना पोलिसांना तो मुंढवा रोड, साईनाथनगर, वडगाव शेरी पुणे येथे येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिस पथक त्या परिसरात दबा धरून बसले. काही काळात हा आरोपी त्या भागातील रावल भवन या इमारतीसमोर आला. त्याने पोलिसांना पाहताच पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.
ही कामगिरी कामगिरी ही पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ४ विजय मगर, मा. सहायक आयुक्त, येरवडा विभाग संजय पाटील चंदननगर पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ निरीक्षक मनीषा पाटील, निरीक्षक (गुन्हे) पंडित रेजितवाड, यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तानाजी शेगर, अंमलदार अविनाश संकपाळ, श्रीकांत शेंडे, विष्णु गोणे, महेश नाणेकर, सचिन रणदिवे शिवाजी धांडे, गणेश हांडगर, शेखर शिंदे, श्रीकांत कोद्रे, सुरज जाधव, नामदेव गडदरे, विकास कदम, ज्ञानोबा लहाने यांनी केली.
Discussion about this post