व्हीएसआरएस मराठी न्युज –राहुल गांधी भेंडवळ मुक्कामी विडा-सुपारी हाती घेवुन हर्षवर्धन सपकाळांसह दिल्ली दिशेने झाले हाेते रवाना. नेमका शुभ संकेत कोणता ?
भेंडवळ नेमके कुठे आहे ? हे माहीत नसले तरी देशभरात भेंडवळ मांडणी बद्दलचे कुतूहल व एक आगळे वेगळे आकर्षण आहे. आगामी काळाची चाहूल व सामाजिक,राजकीय, नैसर्गिक व कृषी विषयक भाष्य या मांडणीत केले जाते. त्यावर अनेकांचा विश्वास आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी चार ढेकळांवर मातीचे मडके ठेवले जाते. सांडया – कुरडया इत्यादी सामग्रीसह सर्व धान्य, कडधान्यची मांडणी करून देशाच्या राजकीय भविष्याचा वेध घेण्यासाठी मधोमध सुपारी ठेवल्या जाते. मांडणी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मांडणीच्या निरीक्षणाआधारे भाष्य व्यक्त केल्या जाते.
अक्षय तृतीयेच्या तिसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रात या मांडणीचे वृत्त ठळकपणे प्रकाशित होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर दैनिकांचा खप होत असतो. तर या मांडणीबद्दल ताबडतोब सविस्तर विश्लेषणात्मक माहिती पुस्तिका देखील प्रकाशित होते. असे या भेंडवळ मांडणीचे आकर्षण आहे. 2014च्या मांडणीत सुपारी हलली असल्याचे निदर्शनास आले व भाष्य व्यक्त केल्यानंतर मनमोहन सिंग यांचे सरकार जाऊन नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले होते. तर भूकंप महापूर याबाबत देखील अनेकदा भेंडवळ मांडणी अचूक राहिली असल्याचे संदर्भ दिल्या जातात.
श्री. राहुल गांधी भारत जोडो पदयात्रेच्या निमित्ताने सात सप्टेंबरला कन्याकुमारी वरून निघालेले असताना बुलढाणा जिल्ह्यातील त्यांचा दुसरा मुक्काम 19 नाव्हेंबर रोजी भेंडवळ या ठिकाणी होता. पहाटे पदयात्रेला रवाना होण्यापूर्वी 125 वर्षांची पुरातन परंपरा असणाऱ्या भेंडवळ मांडणीकर्त्या वंशातील श्री. सारंगधर महाराज वाघ व श्री. पुंजाजी महाराज वाघ यांनी श्री. राहुल गांधीची भेट घेतली व गांधींच्या हाती चक्क पान – सुपारी असा विडा देत भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. या बाबद चौकशी केली असता, या परंपरेबद्दल त्यांना अवगत करण्यात आले. भेंडवळ मुक्कामी श्री राहुल गांधी यांना विड्याचे पान व सुपारी मिळणे म्हणजे मांडणी संदर्भा नुसार सुपारी म्हणजे देश्याच्या राजाचे स्थान तर विड्याचे पान म्हणजे वैभव अश्या शुभ संकेतांची आगळीवेगळी भेट श्री राहुल गांधींना मिळाली आहे.
भेंडवळची विडा-सुपारी घेऊन लगत उभ्या असणाऱ्या हर्षवर्धन सपकाळांना गाडीत बसवीत सोबत घेऊन राहुलजी 20 नोव्हेंबर रोजीच्या दिल्ली दिशेकडे उत्तरेला पदयात्रा आरंभ स्थळा कडील मोठी गर्दी जमलेल्या दिशेने रवाना झाले.
आज भेंडवळ मांडणी प्रसिद्ध होत असताना आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या विधानसभा की लोकसभा ? हे निवडणुकीच्या संदर्भातील गुढ उकलेल की अजून काही आगामी काळातच कळेल एवढे मात्र निश्चित.
Discussion about this post