व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये उद्या सोमवारी सकाळी १० ते १२ यावेळेत जनसंवाद सभा होणार आहे.
या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय मुख्य समन्वय अधिका-यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. ते या जनसंवाद सभेचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील फेब्रुवारी 2017 मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ 13 मार्च 2022 रोजी संपुष्टात आला. त्यापूर्वीच निवडणूक होणे अपेक्षित होते. परंतु, कोरोना महामारी, ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण, राज्यातील राजकीय अस्थिरता यामुळे गेल्या वर्षभरापासून प्रभाग रचना, आरक्षण अन् मतदार याद्या यातच महापालिका निवडणूक प्रक्रिया रखडली. निवडणूक वेळेत होऊ शकली नसल्याने महापालिकेवर प्रशासकीय राज आहे. त्याला एक वर्ष पूर्ण झाले.
वर्षभरापासून निवडणूक लांबणीवर जात आहे. त्यामुळे इच्छुक वैतागले आहेत. निवडणूक कधी होईल याची सगळीकडे चर्चा आहे. न्यायालयातील सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत अनिश्चितता कायम आहे.
Discussion about this post