व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवानिवृत्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय यांचा आम आदमी पार्टी मध्ये आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या हस्ते आप मध्ये पुणे येथे प्रवेश करण्यात आला,
नुकत्याच दोन महिन्यापूर्वी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल रॉय सेवानिवृत्त झाल्या नंतर त्यांनी आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे काम पाहून प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे
डॉक्टर अनिल रॉय यांचा पिंपरी चिंचवड शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावरती संपर्क आहे, येणाऱ्या काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रवेशामुळे आम आदमी पार्टीला मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे
या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, अप प्रवक्ते प्रकाश हगवणे, डॉक्टर अमर डोंगरे, सिताताई केंद्रे, डॉक्टर अभिजीत मोरे व आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
Discussion about this post