व्हीएसआरएस मराठी न्युज –पिंपरी-चिंचवड शहर कार्यक्षेत्रामधील उद्योजकांचे महापालिकेशी संबंधित असणारे प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी, कार्याभ्यास व कार्याचे मूल्यमापन करुन नियोजन व विवेकपूर्ण समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची गरज होती.
त्यानुसार पालिकेने उद्योग सुविधा केंद्र स्थापन कक्षाची स्थापना केलेली आहे. शहरातील तांत्रिक उद्योगांना सामाजिक उत्तरदायीत्व म्हणून महापालिकेमार्फत द्यावयाच्या सोयी-सुविधांचे कामकाज व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) कक्षामार्फत होत आहे. या कक्षाची जबाबदारी मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पोमण यांच्याकडे आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत डॉग, कॅट पार्क, डॉग, मॉल, बहिणाबाई प्राणीसंग्रहालय पुनर्विकास, भोसरी येथील मत्स्यालय पुनर्विकास आणि तळवडे मृग उद्यानाचे कामकाज करण्यात येत आहे. ही कामे जलद गतीने होण्यासाठी तसेच कार्यपध्दतीमध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी ढोले यांनी संबधित विभागांना निर्देश द्यावेत. तसेच कामकाजाचा मासिक अहवाल आयुक्तांना सादर करावा लागणार आहे.
याबाबतचा आदेश महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी काढला आहे.
Discussion about this post