व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील बांच्या मार्गदर्शखाली कार्यवाही करण्यात आली.
बुलेट, केटीएम ड्युक सारख्या महागाड्या दुचाकी चोरणारे वाहन चोरटे देहूरोड पोलीसांच्या हाती लागले आहेत. पोलीसांनी या चोट्याकडुन चोरी केलेल्या ०५ महागड्या दुचाकी आणि मोबाईल फोन जाम करून ०५ गुन्हे उपडकिस आणले आहेत.
१) बुद्धदेव विष्णु विश्वास (वय २४ वर्ष, सध्या रा. सांगवी, पुणे, मुळगाव- पश्चिम बंगाल) आणि २) देवाशिष मधुसुदन विश्वास (वय २३ वर्ष, सध्या रा. सांगवी, मुळगाव- पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्या सराईत चोरट्यांची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहन आणि मोबाईल फोन च्या चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सुचना प्रमाणे देहुरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी तपास पथकातील अधिकारी व अमलदार यांना कारवाई करणे बाबत सुचना केल्या. देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे त्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत
असताना पोलीस उप-निरीक्षक प्रसाद गोवले यांना एक केटीएम | ड्युक दुचाकीवर स्वार असलेल्या दोन इसमांवर संशय आला. उप- निरीक्षक गोवले यांनी त्यांच्याकडे चौकशी सुरु केली. दरम्यान, दोन | इसमां पैकी एक इसम पळुन जाण्यास यशस्वी झाला. त्यामुळे उप-निरीक्षक गोवले यांचा संशय आणखीण बळावला. त्यांनी त्वरीत तपास पथकातील अंमलदार यांना मदतीसाठी बोलावले. पळुन गेलेल्या इसमाबाबत त्याच्याकडे चौकशी सुरु केली. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे यांनी पळुन गेलेल्या इसमाच्या मोबाईल फोन वरुन तांत्रिक विश्लेषन सुरु केले.
माहिती समोर आली. सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिये यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः सोबत एक पथक घेवुन कल्याण रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले.
कल्याण रेल्वे स्थानकावर गर्दीच्या ठिकाणी मोठ्या शिताफिने सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिग्रे आणि त्यांच्या तपास पथकाने त्या इसमाला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी एक केटीएम ड्यूक, दोन बुलेट एक हिरो होन्डा कंपनीची पेंशन आणि अक्टिव्हा गाडी अशा एकुण ०५ महागड्या गाड्या आणि एक मोबाईल फोन त्याच्या साथीदाराच्या मदतीने चोरी केली असल्याची कबुली पोलीसांना दिली. या चोरट्यांनी देहुरोड
देहुरोड पोलीसांनी या चोरट्यांकडुन एकुण ०५ लाख ७४ हजार रुपये किमतीच्या ०५ महागड्या दुचाकी आणि एक ओपो कंपनीचा मोबाईल फोन जम केला आहे. आरोपी बुद्धदेव विश्वास याच्यावर पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण २० गुन्हे दाखल आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहीया, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, देहूरोड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील बांच्या मार्गदर्शखाली सहायक पोलीस निरीक्षक दिगंबर अतिये, उप-निरीक्षक प्रसाद गोवले पोलीस हवालदार पवार, सामील प्रकाश यादव, पोलीस शिपाई शेजाळ, सावळे, अत्तार, परदेशी यांच्या पथकाने कामगिरी केली आहे.
Discussion about this post