व्हीएसआरएस मराठी न्युज –
हॉलीवूड अभिनेते मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोव्यात आयोजित ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मंगळवारी समारोप पार पडला, यावेळी डग्लस यांना या मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
इफ्फीच्या समारोपासाठी मायकल डग्लस यांची पत्नी नामवंत अभिनेत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या कॅथरिन झिटा जोन्स, त्यांचा मुलगा अभिनेता डायलन डग्लस हे देखील उपस्थित होते.
डग्लस यांना या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Discussion about this post