व्हीएसआरएस मराठी न्युज -इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ (आयडीएल) समितीचे अध्यक्ष डॉ. नचिकेत महींद्रकर आणि सचिव डॉ. अमित द्रविड यांनी सांगितले की, या ऑलिंपिक स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि थ्रो-बॉल हे सांघिक (टिम) खेळ तसेच बॅडमिंटन, टेनिस, अॅथलेटिक्स्, कॅरम, बुद्धीबळ, टेबल-टेनिस, लॉन-टेनिस असे वैयक्तिक क्रीडाप्रकार खेळविण्यात येणार आहेत. ‘इंडियन डॉक्टर्स ऑलिंपिक’ स्पर्धेचे सामने श्री शिवछत्रपती क्रीडा संकूल-बालेवाडी, पीवायसी हिंदू जिमखाना, डेक्कन जिमखाना क्लब, व्हिजन क्रिकेट अॅकॅडमी-सिंहगड रोड, स्केलअप अॅकॅडमी मैदान-वारजे, डीएसके स्टार क्रिकेट अॅकॅडमी-धायरी आणि शिंदे हायस्कूल-सहकारनगर अशा विविध मैदानांवर होणार आहेत.
पुण्यामध्ये ३० नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीमध्ये होणार आहे.
या सांघिक खेळामध्ये पुरूषांचे ४० संघ सहभागी
संयोजन समितीचे डॉ. नितीन गडकरी आणि डॉ. संदीप पाटील यांनी सांगितले की, सांघिक आणि वैयक्तिक क्रीडाप्रकारांमध्ये मिळून देशातील दीड हजाराहून अधिक डॉक्टर्स सहभागी झाले आहेत. यामध्ये मुख्यतः एमबीबीएस डॉक्टर्स असून बीएएमएस, बीयुएमएस आणि बीडीएस डॉक्टरांचाही सहभाग आहे. सुमारे १२०० पुरूष आणि ३०० महिला डॉक्टर्स अशी त्याची वर्गवारी आहे. क्रिकेट या सांघिक खेळामध्ये पुरूषांचे ४० संघ सहभागी झाले आहेत. फुटबॉल क्रिडाप्रकारामध्ये पुणे, मुंबई आणि कर्नाटक येथून १० संघ सहभागी झाले आहेत. व्हॉलीबॉलमध्ये पुणे, अहमदनगर, मराठवाडा, कोल्हापूर येथून एकूण १० संघ सहभागी झाले आहेत. महिलांच्या थ्रो बॉलमध्ये पुण्यातील ५ संघ सहभागी झाले आहेत.
Discussion about this post