व्हीएसआरएस मराठी न्युज –ज्येष्ठ कायदेतज्ञ डॉ. बिरेंद्र सराफ (Senior Advocate Birendra Saraf) यांची महाराष्ट्र राज्याचे नवे महाधिवक्ता (Maharashtra New Advocate General) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मंगळवारी झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती.
राज्यपाल कोश्यारी यांनी मान्यता दिल्यानंतर सराफ हे राज्य सरकारचे हायकोर्टातील मुख्य वकील म्हणजेच ‘महाधिवक्ता’ म्हणून पदभार स्वीकारतील.
मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून डॉ. बिरेंद्र सराफ यांनी पदवी प्राप्त केली आणि पदवीच्या तिनही वर्षात मुंबई विद्यापीठाचे टॉपर होते. त्यानंतर कनिष्ठ वकील म्हणून त्यांनी विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या चेंबरमध्ये बराच काळ काम केलेलं आहे. सराफ यांची साल 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय सराफ यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून काम पाहिलेलं आहे. सध्या ते संस्थेच्या उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
Discussion about this post