व्हीएसआरएस मराठी न्युज –निगडी दी.२६, शहर कॉँग्रेस कमिटी निगडी विभागाच्या वतीने छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त “सामाजिक न्याय दिवस” अंतर्गत ‘शाहू महाराज एक उत्तुंग प्रेरणा’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले तसेच प्रभाग क्रमांक २२ मधील कार्यकर्त्यांचा मेळावा दि. 26 जून रोजी
निगडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील दुर्गा माता मंदिर येथे आयोजित करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. डॉ. कैलास भाऊ कदम (कामगार नेते, शहराध्यक्ष, काँगेस कमिटी पिंपरी चिंचवड शहर) यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात श्री. कैलास भाऊ कदम यांनी महाराजांना अभिवादन केले व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी प्रमुख वक्ते नरेंद्र बनसोडे (वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, पिंपरी चिंचवड शहर) यांनी शाहू महाराजांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकत मागदर्शन केले, ते म्हणाले
“शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारण, पाणवठा, विहिरी सर्वांसाठी खुल्या करणे,सामाजिक समतेसाठी संस्थानच्या नोकऱ्या मध्ये ५०% आरक्षण, मोफत व सक्तीचे शिक्षण, विधवा पुनर्विवाह, आंतरजातीय विवाह, आधुनिक शेती संशोधन, अंधश्रद्धा निर्मूलन या बाबीवर विशेष भर देत जनतेला उत्तम जीवन मान बहाल केले. धरण निर्मिती, गूळ बाजरपेठ, शेती सहकारी संस्था, कर्ज योजना, कलावंत, चित्रकार, कुस्तीपटूना प्रोत्साहन, दलितांना नवे उद्योगासाठी मदत, वसतिगृहे निर्मिती आदी सामजिक व आर्थिक विकासाचे स्त्रोत सुरू केले. शिक्षण,शेती व समता या त्रिसूत्री नुसार शाहू महाराजांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे बनसोडे यांनी सांगितले
कार्यक्रमाचे आयोजन श्री. सूरज गायकवाड (काँग्रेस युवा नेते, निगडी, प्रभाग क्रमांक २२) व सौ.शिल्पाताई सूरज गायकवाड (काँग्रेस नेत्या, निगडी, प्रभाग क्रमांक २२) यांनी केले.
सदरील कार्यक्रमाला सौ.सायलीताई नढे (महिला काँग्रेस, शहराध्यक्षा, पिंपरी चिंचवड शहर) श्री. कौस्तुभ नवले (युवक काँग्रेस, शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड शहर)
श्री.उमेश खंदारे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, एन. एस.यु. आय) श्री. अभिमन्यू दहीतूले (माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष, पिंपरी चिंचवड मनपा) श्री. दिलीप पांढारकर (वरिष्ठ उपाध्यक्ष, काँग्रेस कमिटी, पिंपरी चिंचवड शहर) श्री.प्रा. बन्सी शिंदे सर (अध्यक्ष, झोपडपट्टी सेल, काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर) श्री. विठ्ठ्ल शिंदे (ब्लॉक अध्यक्ष, काँग्रेस भोसरी विधानसभा) श्री.विशाल सरवदे (अध्यक्ष, रोजगार व स्वयंरोजगार काँग्रेस सेल, पिंपरी चिंचवड शहर) श्री. किरण नढे, श्री.हिरा जाधव, श्री. किरण खाजेकर, श्री. राजेंद्र काळभोर, श्री. सुरेश लिंगायत,श्री. हर्षवर्धन पांढारकर आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच काँगेस कमिटी निगडी मधील श्री. अमरजीत सिंग, श्री. गौतम गायकवाड, श्री. चंद्रकांत गायकवाड, श्री.देवाप्पा अल्लापुर, श्री. प्रकाश मकासरे, श्री. बसवा मगी, श्री. रजनीकांत अल्लापुर, किशोर लांडगे, आकाश बोगडे, उमेश कांबळे, अविनाश शिंदे, राजू शिरसाठ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये रिपब्लिकन सेना भोसरी विधानसभा अध्यक्ष श्री. एकनाथ कसबे यांनी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
Discussion about this post