व्हीएसआरएस मराठी न्युज पुणे-भाजपचे नेते व माजी खासदार किरीट सोमय्या यांना पुणे महापालिकेच्या ज्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की करण्यात आली होती त्याच पायरीवर भाजपने (ता.11 फेब्रुवारी) सत्कार केला होता. सत्काराला परवानगी नाकारूनही हा कार्यक्रम झाला होता. चक्का धक्काबुक्की करत कार्यकर्ते महापालिकेत घूसले होते..
या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक युवा मोर्चा अध्यक्ष बापू मानकर , नगरसेवक दीपक पोटे प्रदीप देसरडा दत्ता खाडे या प्रमुख कार्यकर्त्यासह 350 ते 400 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमय्यांचा सत्कार झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या त्या पायरीवर गोमुत्र शिंपडून पायरीला धुतले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोमय्यांच्या येण्याने हा परिसर अशुद्ध झाला होता. पुणे शहरात अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असताना पुणे पालिकेतील सत्ताधारी भाजपने स्वतःच्याच पक्षाच्या नेत्याचा सत्कार करत असल्यामुळे पायरी धुतल्याचे सांगितले. पुणे काँग्रेसचे कार्यकर्ते सचिन आडेकर यांनी ही पायरी गुलाबपाणी आणि गोमुत्र शिंपडून धुतली आहे.
Discussion about this post